शांततापूर्ण बौद्ध वारसा स्थळांसाठी प्रसिद्ध असलेले औरंगाबाद शहर जगाच्या नकाशावर आशियातील वेगवान प्रगती करणारे शहर, मर्सीडीज गाड्यांचे शहर आणि एेतहासीक पर्यटननगरी म्हणून सर्वज्ञात आहे. सातवाहन-यादव राजवंश, मुहम्मद बिन तुघलक, अन् मुघल आणि नंतर निझाम अशा एकामागून एक अनेक राजवटींचा अंमल या शहरावर होता. इतिहास, परंपरा आणि आधुनिकता जेथे एकत्रित नांदतात ते शहर म्हणजे औरंगाबाद. जागतिक वारसाच्या स्मारकांच्या यादीत समाविष्ट असलेल्या अजिंठामधील रंगीत चित्रे, वेरूळमधील मूर्ती आणि एलिफंटा गुहेतील दैवी अवशेष पाहुन पर्यटक अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात. अजिंठा-वेरुळच्या लेण्या म्हणजे महाराष्ट्राची गौरवस्थाने! अशीच अनेक वेगवेगळ्या प्रकारची पर्यटन स्थळे या शहरात शतकानुशतके उभी आहे.
आज 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन जगभर साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे यंदाचे यजमान पद भारताकडे देण्यात आले आहे. ‘पर्यटन आणि नोकरीः सर्वांसाठी चांगले भविष्य’ या थीमवर जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगानेच पर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग या विषयावर विचार करने गरजेचे ठरते. कधी एके काळी फक्त तीर्थयात्रा म्हणजेच पर्यटन असा समज असलेल्या भारतीय समाजात काळानुरुप झालेले अनेक बदल सहज दिसून येतात. पर्यटन क्षेत्रात येणारे नवनविन ट्रेंड आजचा युवक आणि सामान्य माणूस देखील चटकन आजमावून पाहत आहे. यात अनेकांनी फिरण्याची आवड जोपासण्यासाठी आपल्या स्थिर नोकरी वर् पाणी सोडत ट्रॅव्हलिंग सुरू केले आहे. आणि यात महिला देखील मागे नाही. गूगलवर सोलो फीमेल ट्रॅव्हलर्स असे सर्च केले तर जगभरातील असंख्य स्त्रीयांची नावे समोर येतील. स्त्रियांसाठी सुरक्षा ही अनेकदा मोठी चिंता असते. बर्याच जणींना स्वत:ची घरे सोडण्याची परवानगी नसते किंवा त्यांची भीती त्यांना अडवून ठेवते. आणि एकट्या महिला प्रवाशांची कल्पना भारतीय समाजात आजही हास्यास्पद आहे. साध सासरहून माहेरी जायला देखील ज्या भारतीय संस्कृतीत बाईला अगोदर परवानगी घ्यावी लागते, त्या समाजातील मुली आता मात्र एकटीने सगळ जग अनुभवण्यासाठी उंबरठा ओलांडत आहे. यात कधी चांगले तर कधी नकोसे अनुभव घेत ती स्वतः चे अस्तित्व शोधत ठाम भूमिका मांडत आहे. त्याचबरोबर पर्यटन व्यवसायात देखील म्हत्वाची भूमिका बजावत आहे. पर्यटन हा एक सेवा देणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. आणि यातील महिलाचे योगदान वाखान्याजोगे आहे. करिअरचे बरेच पर्याय जसे की आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत विमानतळांवरील कस्टमर ग्राऊंड हँडलिंग (ग्राहक सेवा), टूर ऑपरेटर, इव्हेंट मॅनेजर, तिकीट अधिकारी, साहसी पर्यटन तज्ज्ञ, परिवहन अधिकारी, हॉलिडे कन्सल्टंट, लॉजिस्टिक, क्रूझ, एअरलाइन्स, सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील हॉटेल्स आणि पर्यटन विभाग महिलांसाठी खुले आहेत.
पर्यटन क्षेत्र हे केवळ संस्कृती, रूढी- परंपरा आणि वास्तु यांच्याशी निगडित राहत नाही. त्यापाठोपाठ रोजगाराच्या आणि विकासाच्या असंख्य संधी देखील उपलब्ध होतात. एक उद्योग म्हणून पर्यटन क्षेत्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत वेगाने प्रवास करीत आहे. विविध ठिकाणी आणि संस्कृतींमध्ये सहजतेने संवाद साधणारे लोकांमुळे जग एखाद्या खेड्याइतके संकुचित झाल्याचे चित्र आपण रोजच बघतो. पर्यटन हा जागतिक स्तरावर सर्वात मोठा आणि वेगाने वाढणार्या उद्योगांपैकी एक आहे. त्याचे फायदे आणि आव्हाने ज्या सरकारने काळजीपूर्वक हातळल्या आहेत त्या राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि शैक्षणिक स्तरातील बदल उघड्या डोळ्यांनी जगाने पाहिलेत. हे क्षेत्र फक्त एकाच स्वरुपातील काम आणत नाही. तर विविध उद्योगांची वाढ आणि विकास यामध्ये होतो. जसे की वाहतूक, निवास, वन्यजीव, कला आणि मनोरंजन. यामुळे नवीन रोजगार निर्मिती आणि परकीय चलन, गुंतवणूक आणि प्रदान केलेल्या वस्तू आणि सेवांच्या देयकामधून उत्पन्न मिळते.
भारताच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटन क्षेत्राचे योगदान सध्या वाढत आहे. 2018 मध्ये देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) जवळपास २ बिलियन अब्ज डॉलर्स म्हणजेच एकूण 10 टक्के वाटा या क्षेत्राचा होता, असे स्टेटिस्टाच्या अहवालात म्हटले आहे. भारतातील रोजगारावरही या उद्योगाचा भरीव परिणाम होत आहे. 2016 मध्ये या क्षेत्राने 25..4 दशलक्षपेक्षा जास्त रोजगार थेट उपलब्ध करुन दिले. यामुळे बेरोजगाराचे वाढते प्रमाण कमी होण्यास हातभार लागू शकतो. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत परदेशी पर्यटक आगमन (एफटीए) ने 7.7% ची वाढ नोंदविली आहे. फेब्रुवारी 2019 मधील एफटीए फेब्रुवारी 2018 मधील 10,49,255 च्या तुलनेत 10,87,694 होता. परदेशी पर्यटकांची वाढती संख्या आनंदाची बाब असली तरी त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण आपण ठेवायला हवे. उगाच रस्त्यात कोणी गोरी बाई दिसली की तीला त्रास देण टाळलेल कधीही चांगलेच. 'अतिथी देवो भवो' या विचारांचे पालन करणाऱ्या संस्कृतीचा आपण भाग आहोत.
पर्यटन हे फिरण्याचे आणि ९-५ या ठराविक वेळेला फाटा देणारे क्षेत्र आहे. यामुळे ज्या महिला अथवा मुलींना मुळातच नवनविन जागांना भेट देण्याची, तिथली संस्कृती, रोजच जगण जाणून घ्यायला आवडत असेल त्यांनी नक्कीच याकडे करिअर च्या दृष्टीने बघायला हवे. भारतातल्या लहान मोठ्या भागातून येणाऱ्या अनेक मुली या सोलो टुरिझम वा सोशल , एडवेंचर अशा अनेक प्रकारच्या पर्यटनाचा सुखद अनुभव घेत स्वावलंबी होत आहे. आपल्या शहरात देखील अनेक महिला ग्रुप अथवा एकट्याने देशविदेशातल्या पर्यटन स्थळांना भेटी देत असतात. अशा ट्रिप्स मुळे नेहमीच घर संसारात स्वतःला बांधून घेणारया बाईला स्वतःला नव्याने शोधण्याची, परखण्यची आणि निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी साधता येते. तेव्हा तुम्ही कधी निघताय तुमच्या पहिल्या वहिल्या सोलो ट्रिप साठी..
पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या प्रतिक्रिया.
जयश्री शेळके. (प्रा. देवगिरी महाविद्यालय)
धावपळीच्या जीवनात सुखाचा अनुभव घेण्यासाठी बाईने एकट्याने प्रवासाचा अनुभव नक्कीच घ्यायला हवा.
देवगिरी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करताना आमचा 9-10 महिलांचा ग्रुप एकत्र आला. यातील सर्वांनाच फिरण्याची आवड असल्याने आम्ही अगोदर जवळच्याच काही स्थळांना भेटी देन सुरू केले. गाडी ठरवणं, पैशांचा हिशोब बघन, हॉटेल्स च बूकिंग करण अशी एकएक काम करत हळूहळू पूर्णच टूरचे नियोजन आता आम्ही स्वतः करतो. या ग्रुप चे वैशिष्ट्य म्हणजे पर्यटनासाठी होणारा सगळा खर्च आम्ही स्व: कमाईतून करतो. आणि हे करताना आमचे कुटुंबिय खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत. आता त्यांनाच सगळं इतक सवयीच झाली की ते स्वता आम्हाला आता कुठे जाणार, अशी विचारणा करतात. आम्ही केवळ धार्मिक यात्रांना जात नाही तर निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध स्थळांकडे आमचा कल असतो. ज्या महिला कधीच घराबाहेर पडल्या नाही, त्या आता घराबाहेर पडताय, जग नव्याने बघताय. आणि यामुळे ती स्वच्छंदी होतीय. आम्ही सर्व महिलांच ग्रुप मध्ये असलो तरी, कुठेही फिरतांना, रात्रीचा प्रवास करताना आम्हाला वाईट अनुभव आजपर्यंत तरी आलेला नाही. कुठेही फिरतांना अनुभवलेले विविध क्षणच जगताना दिशादर्शक ठरतात.
माया नरसापूर. (मेकॅनिकल इंजीनियर, जॅपनीज इंटेर्प्रेटर-गाइड)
भाषांतर करणारी अनेक साधने उपलब्ध असली, तरी प्रभावी संवादासाठी भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे..
औरंगाबादला अजिंठा- वेरूळ अशी बुद्धाशी निगडीत पर्यटन स्थळे असल्यामुळे येथे जपान मधून दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. जॅपनीज भाषेला त्यामुळे इथे मोठा वाव आहे. इतरांना ही भाषा शिकवताना मी टुरिस्ट गाइड च कोर्स केला. आणि 2005 पासून मी शहरातील एकमेव महिला गाइड म्हणून काम सुरू केल आहे. ८० वर्षापेक्षाही जास्त वयाच्या एका जोडप्यासोबत काम करताना मला कळाल की ते दोघांनीही वयाच्या ८०व्या वर्षी माऊंट एवरेस्ट सर करण्याचा विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवला आहे. एकल महिला गाइड अथवा इंटरप्रीटर म्हणून काम करताना कोणताही वाईट अनुभव मला कधी आला नाही. अगदी जपानला देखील मी एकटी जाऊन आलीय. तिथे सुद्धा नकारात्मक अनुभवला सामोरे जावे नाही लागले. आणि फिरण्याची आवड असणार्या तरुणांनी खास करून मुलींनी देखील या क्षेत्रात यायला हव. घर बसल्या सगळ्या जगाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.
दीपा खेकाळे (प्रा. देवगिरी महाविद्यालय)
कुशल अथवा अकुशल दोघांनाही रोजगार देणारे क्षेत्र म्हणजे टुरिझम..
गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटन हा विषय शिकवताना एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली ती म्हणजे, ज्या मुलांना या क्षेत्रात आवड आहे त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळाले तर ती स्वतः नवनविण कल्पना पुढे आणून त्यावर चांगलं काम करतात. त्यांना कोणत्याही मर्यादा राहत नाही. आणि हे क्षेत्र असे आहे जिथे कुशल व अकुशल दोन्ही मनुष्यबळाला सहज काम मिळवून देते. औरंगाबाद हे खूप मोठ पर्यटन स्थळ असले तरी सध्या मात्र इथले टुरिझम कुठेतरी मागे पडल्याचे जाणवते. पूर्वी सीजन मध्ये जसे खूप फॉरेन टुरिस्ट दिसायचे तसे आता क्वचितच एखादा दूसरा पर्यटक दिसतो. यासाठी आपण केवळ व्यवस्थेला जबाबदार नाही ठरवू शकत. आपण देखील स्वता: हुन पुढाकार घेत इथल्या पर्यटन स्थळांची होणारी दुरावस्था थांबवायला हवी.
उल्का जोशी. (सायली संजय पिले).
शहरातील पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी एअर कनेक्टीविटी महत्त्वाची.
आमचे स्वतःचे टुरिस्ट हँन्डीक्राफ्ट चे शॉप रेल्वे स्टेशन होते. इथे येणार्या पर्यटकांना बघून त्यांच्यासाठी काही करता यावे, त्यांना अजून काही चांगलं देता यावे, ही भावना पर्यटन क्षेत्रात येण्यास कारणीभूत ठरली. आणि खर तर माझ्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या एका तरी मुलीने पर्यटन क्षेत्रात काम कराव. मुख्य म्हणजे मी 11वी पासून तर पीजी पर्यतंच सगळ शिक्षण हे टुरिजम मध्येच घेतल आहे. 12वी च्या सुटयांमध्ये काही कराव या हेतूने मी प्रसन्न होलीडेज मध्ये पार्टम करण सुरू केल. आणि त्यानंतर आता 2014 मध्ये अस्सिटन्ट ब्रांच मॅनेजर म्हणून काम केल. आणि आता काही कारणांमुळे मी नौकरी करू शकत नसले तरी काम करताना ग्राहकाशी जपलेल्या नात्यामुळे अजूनही मी त्यांचे टूर प्लॅन बनवून द्यावेत अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे मी आता टूर प्लॅन बनवून देण्याच काम करते. आणि जे लोक बाहेरच्या देशात जाऊ इच्छिता त्यांना मी आवर्जून सांगते, की अगोदर आपला विविधतेन नटलेला भारत देश बघा. जगाच्या नकाशावर औरंगाबाद आकर्षणाच केंद्रबिंदू आहे. मात्र याविषयी जागरूकता निर्माण करणे. आणि कनेक्टिविटी वाढवण्यावर भर द्यायला हवी.