Sunday, March 24, 2019

Dear MUNNO....

                Munno ... म्हणजेच माझी एकुलती एक बहिण. घरात जरी तुला ताई म्हणत असले  तरी मी कधी तुला ताई म्हणल नाही. कारण? तुला तर महितीय तू आणि मी बहिणी सारखं कधी वागतच नाही तेव्हा तुला ताई म्हण्याचा प्रश्नच नाही. जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून तू कायम माझी मैत्रीण म्हणूनच माझ्या सोबत आहेस. साधारणपणे इतर कोणत्याही मोठ्या बहिणी सारखीच तू. मला सपोर्ट करण, सतत ऑर्डर झाडत राहणं, प्रत्येक गोष्ट समजावून सांगणं, आईला मस्का कसं न कुठे लावायचा हे पण सांगणारी आणि राग आल्यावर सगळा राग माझ्यावर काढण हे तुझ आवडत काम.  पण तरी तू स्पेशल आहेस. स्वतच्या स्वप्नांसाठी लढत राहणं आणि ते शेवटी पूर्ण करण, हा तुझा स्वभावच तुला वेगळं बनवतो. तसं तर या जगात आल्यापासूनच तुझ लढण सुरू झाल. जग बघण्याची तुला घाई झाली असावी वाटत. म्हणून तर ९ महीने पूर्ण होण्या आधीच तुझा जन्म झाला. आई सांगत असते न आपल्याला एवढी बारीक होती तू की धड तुला धरताही येत नव्हतं. जगली तर जगली नाहीतर बघू अस मनोमन ठरवून तुला घरी आणल. आणि तू जगलीस. तेव्हापासून सुरू झालेली तुझी जगण्याची लढाई अजूनही चालूच आहे. 
                घरात लहान मी असले तरी लाड मात्र तुझे जरा जास्तच होता नं त्याचा मला राग आला तर माझ्यावर हसण्यात मजा येते तुला. पण मी मार खात असेल तर माझ्या रक्षणार्थ तू जस धावून येते नं . हाय बहीण असावी तर अशी.... 😉😉   तुझ नं माझ नेहमीच पटत त्यामुळे तुझ काम असल्यावर घरात मी मस्का मारायचा नं माझ असल्यावर तू . हे आपल ठरलेलं. रात्री सगळे झोपले की मग आपल बोलण सुरू दिवसभर काय केल, काय घडलं, कोणाला भांडली सगळ बोलायचो आपण. पण आता तू जाऊन बसलीय तुझ्या घरी ..नं मी घरात एकटी पडले. तुझ्या लग्नात मी रडणारच नाही हे आधीपासूनच मी तुला सांगून ठेवल होत. पण तू गेल्यानंतर खूप रडले ग मी आणि नंतर विचार आला मनात.. यार रडले असते तर निदान एखाद छान फोटो आला असता नं माझा पण 😜 
         जग अनुभवण जगण हे तू मला तू शिकवलं. कोणी सोबत असो वा नसो तू कायम माझ्यासोबत असते. आणि मी चुकल्यावर मला शिव्या पण घालतेच की. नशीब तस चांगलच आहे वाटत माझ म्हणून तर तू माझी बहीण आहेस नं. अशीच कायम माझ्या सोबत रहा. मला चांगलं वाईटची जाणीव करून देत जा. (आणि हे कर ते कर म्हणत माझ्यावर ऑर्डर झाडत राहणं मात्र सोड यार 😒)    आई म्हणते  नं आपल्याला तुम्ही पवारांच्या पोरीच आघाव आहात. तर असाच आघावपणा करत मस्त मनाप्रमाणे तू जगत रहा. केवळ माझी बहिण न होता माझी मैत्रीण सुद्धा झालीस तू. Thanks munno..   आणि हो प्रकटदिंनाच्या हार्दिक  शुभेच्छा .....     
 
 

No comments:

Post a Comment

AIFF... सिनेमाला प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारा महोत्सव...

                सि नेमा... कथा, संगीत, अभिनय आणि तंत्रज्ञान  ही यातली काही ठळक घटक.  चित्रपटांना कोणी समाजाचा आरसा म्हणतो तर कोण...