हिजडा... तसा तर बहुतांश वेळा (नेहमीच ) शिवी म्हणूनच वापरला जाणारा हा शब्द. कोणालाही हिनवण्यासाठी, कोणी एखादा बाई सारखा चालत-बोलत असेल, किंवा मग मोठयाने हसणार्या व्यक्तिला उदेशून सर्रास वापरला जाणारा हा शब्द. पण यामुले मूळ संकल्पना तशी दुर्लक्षितच राहिली. 'हिजडा' हा मूळ उर्दू शब्द आहे. तेही आलाय 'हिजर' या अरेबिक शब्दावरून. आपली जमात सोडलेला, त्या जमतीतून बाहेर पडलेला म्हणजे हिजर होय. अर्थातच स्त्री-पुरुषाच्या नेहमीच्या समाजातून बाहेर पडून राहणारा स्वतंत्र समाज. हा समाज आपल्या पूर्ण देशात आहे. केवळ राज्याराज्या नुसार त्यांची पार्श्वभूमी, इतिहास वेगळा आहे.
‘स्ट्रेट’ समाजाला समांतर असा हिजडय़ांचा एक स्वतंत्र समाज आहे. हिजडय़ांची दिल्लीवाला, पूनावालासारखी आठ घराणी आहेत. हिजडय़ांच्या समाजात त्यांचे ‘गुरू’ असतात. या गुरूंवर हिजडय़ांच्या आठ घराण्यांचे ‘नायक’ आहेत. आज तरी हिजडय़ांना त्यांचे स्वत:चेच कुटुंबीय आणि समाज स्वीकारीत नसल्यामुळे, हिजडय़ांना त्यांच्या अस्तित्वासाठी ‘गुरू’ आणि ‘नायकांवर’ अवलंबून राहणं भाग आहे. L.G.B.T.I. मधला हा चौथा प्रकार आहे ‘ट्रान्सजेंडर्स’. आपल्या समाजात आपण त्यांना ‘तृतीयपंथी’ म्हणून ओळखतो. तृतीयपंथींतले जे तृतीयपंथी ‘गुरूं’कडे जाऊन दीक्षा घेतात. अशा तृतीयपंथींना ‘हिजडा’ असं म्हटलं जातं. . हिजडे स्वत:ला ‘स्त्री’ समजतात व पुरुषांकडे आकर्षित होतात. हिजडय़ांच्या समाजात आजच्या घडीला तरी ‘बस्ती’, ‘बधाई’, ही उपजीविकेची साधनं उपलब्ध आहेत. ‘बस्ती’ म्हणजे भीक मागणे, ‘बधाई’ म्हणजे समारंभाच्या ठिकाणी नाचगाणी करून पैसा मिळविणे. पोलीस हिजडय़ांना भीक मागू देत नाहीत. सध्याच्या काळात समारंभातून केल्या जाणाऱ्या नाचगाण्यांवर पोट भरणं जवळजवळ अशक्य आहे. मात्र अशा परिस्थितीवर देखील मात करून अनेकांनी पुढचं पाऊल टाकण्यास आरंभ केला आहे. शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात ते काम करताय. त्यांच्यात देखील आपल्यासारखीच स्वताला सिद्ध करण्याची क्षमता आहे फक्त गरज आहे ती आपण आपल्या विचारांचा उंबरठा ओलाडण्याची .
प्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशात लैंगिक विषयांवर उघडपणे चर्चा करणं फारसं चांगलं मानलं जात नाही, हे अर्थातच एक आश्चर्य आहे. समलैगिंक किंवा तृतीयपंथी असण हा काही रोग नाही ते नैसर्गिकच आहे. पण गैरसमजामुळे त्यांची समाजाकडून उपेक्षा होते. निकोप समाजासाठी त्यांना सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे आहे. समलैंगिकता किंवा ट्रान्सजेंडर हे नैसर्गिक आहे. हे शास्त्रानेही ते सिद्ध केलेले आहे. पण आपल्याकडे या लोकांची उपेक्षा होते. त्यांच्यासाठी 'हिजडा' म्हणजे समाजात स्थान नसलेले असा शब्द सर्रास वापरला जातो. पण या लोकांमध्ये वेगवेगळ्या शारिरीक स्थिती असतात. इंग्रजीत त्या सगळ्यांना नावे ठरलेली आहेत. पण आपल्याकडे अजूनही त्याबाबत काहीही माहिती नाही. होमो, गे किंवा ट्रोन्सजेंडर हे नैसर्गिक आहे. ती आपल्यासारखीच माणसे आहेत
एलजीबीटीक्यूमधील 'एल' म्हणजे लेस्बियन. 'जी'चा अर्थ गे असा असून 'बी' म्हणजे दोन्ही जेंडर्स असलेले लोक. त्यांना बाय-सेक्सुअलही संबोधलं जातं. 'टी'चा अर्थ ट्रान्सजेंडर असा असून 'क्यू' म्हणजे क्यूएर असा आहे. क्यूएर वर्गातील लोकांचं त्यांच्या सेक्सुअल ओरिएंटेशनबाबतीत ठराविक मत नसतं. त्याचं प्रदर्शनही ते करत नाहीत. पुरूष समलिंगीला इंग्रजीत गे (Gay) आणि महिला समलिंगींना लेस्बियन (lesbian) असे म्हणतात. समलैंगिकता अगदी प्राचीन काळापासून सर्व देशांत आहे. पण आत्ता खुलेपणाने ती जितकी समोर येतेय तेवढी ती कधीच नव्हती. आता तर अनेक देशांनी त्याला कायदेशीर मान्यता दिली आहे. काही देश मात्र याच्या कठोर विरोधात आहेत.
स्वतःच अस्तित्व जपण्यासाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्या हक्कांची लढाई हा समाज लढत आहे. आणि अशातच समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारं भारतीय दंड संहितेचं कलम ३७७ सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी रद्द ठरवलं आहे. त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगीबाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही. हा समलिंगी समुदायाला मोठा दिलासादेखील मिळाला. अर्थात त्यांची ही लढाई इथेच थांबणारी नाही. तेव्हा आपणही त्यांच्या लढाईचा एक भाग होऊन भक्कम आधार निर्माण करायला हवा. थोडक्यात, निसर्गत: समलिंगी संबंधांची भावना निर्माण होते अशा व्यक्तींना दोष देणे आपला मुर्खपणा आहे. त्यांनाही सन्मानाने जगायचा, आपले हक्क अबाधित ठेवण्याचा अधिकार आहे व तो नाकारणे अमानवी आहे. केवळ कायद्यातच नव्हे तर मानवी दृष्टीकोनातही बदल होणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment